26 February 2024

मिठाई ताजी आहे की शिळी हे कसे ओळखावे?

Mahesh Pawar

मिठाईच्या दुकानातली मिठाई साधारणपणे दुधापासून बनवलेली असते.

दुधापासून बनवलेली मिठाई मऊ असते. त्यावर क्रॅक नसतो. 

पण, मिठाईत कलाकंद असेल तर तो थोडा रवाळ असतो. त्यावर रेघा दिसणार नाहीत.

ताजी मिठाई चमकदार दिसते तर शिळी मिठाईची चमक कमी झालेली दिसते.

म्हैसूर पाक सारखी मिठाई शिळी असेल तर ज्या थाळीत ती ठेवली असेल त्या थाळीत खाली तूप जमा झालेले दिसते.

जी मिठाई घ्यायची आहे ती थोडी खाऊन पहावी किंवा हातात घेऊन तोडून पहावी.

मिठाई दूधाची असेल तर ताजेपणा, मऊपणा लगेच लक्षात येतो.

दुधाची म्हणजे रसमलाई वैगेरे मिठाई शिळी असेल तर त्यावर सायचा किंवा तूपाचा थर येतो.

पनीरचे रसगुल्ले सोडलेले असतात ते कडक झालेले दिसले की समजावे शिळे आहेत.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स