22 February 2024

सावध टाका पाऊल! हा आहे सर्वात लांब काचेचा पूल, कुठे आहे हा पूल?

Mahesh Pawar

असे अनेक पूल आहेत जे दोन रस्त्यांना जोडतात आणि उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण आहेत.

अनेक पूल त्यांच्या सौंदर्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतात आणि पर्यटन स्थळे बनतात.

केरळच्या वागमोन कोलाहलामेडू ॲडव्हेंचर गावामध्ये देशातील सर्वात लांब काचेचा पूल बांधण्यात आला आहे.

या काचेच्या पुलाची लांबी ४० मीटर आहे. हे समुद्रसपाटीपासून 3500 फूट उंचीवर आहे.

केरळमध्ये हा पूल बांधण्यासाठी जर्मनीतून काच आयात करण्यात आली होती.

काचेच्या पुलावर सुमारे 35 टन स्टील आहे. या पुलाजवळ वागामन ॲडव्हेंचर पार्क देखील आहे.

जिथे पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग यासारख्या अनेक साहसी आणि रोमांचक गोष्टींचा आनंद घेऊ शकता.

काचेच्या पुलाला भेट देण्यासाठी तुम्हाला तिकीट घ्यावे लागेल. ज्याची किंमत सुमारे प्रती व्यक्ती 250 रुपये इतकी आहे.

कोझिकोड विमानतळ किंवा कोझिकोड रेल्वे स्थानकावर पोहोचा. तेथून वायनाड सुमारे 100 किलोमीटरवर आहे.

वायनाडला पोहोचल्यानंतर ग्लास ब्रिजकडे जाण्यासाठी टॅक्सी उपलब्ध आहेत.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स