26 February 2024
Mahesh Pawar
जगात अशी काही शहरे आहेत जिथे त्यांचे नियम जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
पण जगात एक शहर असे आहे की जिथे मरणाला आणि आजारी पडण्याला बंदी आहे.
500 लोकसंख्या असलेल्या इटलीतील सेलिया शहरात लोकांना आजारी पडण्याची किंवा मरण्याची परवानगी नाही.
असे झाल्यास त्यांना 10 युरोचा दंड ठोठावण्यात येतो. लोकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
फ्रान्समधील कॉग्नाकमध्ये मरण्यावर बंदी आहे. कारण, स्मशानभूमी बांधण्यासाठी नगराध्यक्षांची परवानगी मिळाली नाही.
जपानमधील इत्स्कुशिमा या पवित्र बेटावर लोकांना मरण आणि जन्म घेण्यास मनाई आहे.
जपानच्या लोकांचा या बेटाच्या पावित्र्यावर खूप विश्वास आहे. म्हणूनच 1878 पासून हा नियम पाळला जात आहे.