26 February 2024

'झलक दिखला जा 11' चे पहिले टॉप 5 स्पर्धक, विजेतेपदासाठी लागली चुरस

Mahesh Pawar

टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा' आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 

'झलक दिखला जा' या शोचा ग्रँड फिनाले 2 मार्चला आहे. टॉप 5 फायनलिस्टपैकी कोणाला झलकची ट्रॉफी मिळणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

मनीषा राणी : ही बिग बॉस ओटीटीची सेकंड रनर अप होती. आता ती JDJ च्या टॉप 5 फायनलिस्टपैकी एक आहे. या शोमध्ये तिने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली.

'ससुराल सिमर का' मधून ठसा उमटवणारा शोएब इब्राहिम गेल्या काही वर्षांपासून यूट्यूब ब्लॉग आणि म्युझिक व्हिडिओंमुळे लोकप्रिय आहे.

शोएब हा लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस 12 ची विजेती दीपिका कक्करचा पती आहे.

अद्रिजा सिन्हा ही JDJ ची सर्वात तरुण स्पर्धक आहे. गन अँड रोझेस, किल आणि सिरफ एक बंदा या वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे.

धनश्री वर्मा कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल याची ती पत्नी आहे.

श्रीरामा चंद्रा हे प्रसिद्ध गायक आहेत. अनेक तेलुगू चित्रपटांसाठी त्यांनी गाणी म्हटली आहेत. श्रीरामा हे इंडियन आयडॉल 5 चे विजेते आहेत.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स