24 February 2024

मुकेश अंबानी यांना मिळाली 'हनुमान' शक्ती, कोणती आहे ही महाशक्ती?

Mahesh Pawar

भगवान रामाचा सर्वात मोठा भक्त म्हणजे हनुमान. त्याचा अर्थही खप मोठा गहन आहे.

हा तोच भक्त ज्याने भारताच्या एका टोकापासून सिलोनपर्यंत थेट झेप घेतली.

लक्ष्मणाला पुनरुज्जीवित करण्यासाठी संपूर्ण संजीवनी पर्वत उचलणारी ती हीच शक्ती.

थोडक्यात, अशक्य शक्तीचे प्रतिनिधित्व करणारा हनुमान. तीच शक्ती आता मुकेश अंबानी यांना मिळाली आहे.

मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या माध्यमातून इंटरनेट क्रांती आणली. आताही ते इंटरनेटमध्ये एक नवी क्रांती करत आहेत.

रिलायन्स जिओ इन्फोकॉम सेंटर आणि भारतातील 8 आयआयटी यांनी संयुक्तपणे 'हनुमान' चॅट विकसित केलंय.

AI किंवा ChatGPT प्रमाणे मुकेश अंबानी यांचा 'हनुमान' मजकूर-टू-टेक्स्ट, टेक्स्ट-टू-स्पीच, टेक्स्ट-टू-व्हिडिओमध्ये रूपांतर करू शकतो.

हनुमान AI मॉडेल मार्चमध्ये लॉन्च होणार आहे. आरोग्य सेवा, प्रशासन, आर्थिक सेवा आणि शिक्षण संबंधित माहिती एका क्लिकवर मिळेल.

हनुमान मुख्यत्वे चॅट GPT च्या धर्तीवर असेल. हे सध्याच्या चॅट GPT च्या काही पावले पुढे असेल.

हनुमान संपूर्ण 360 डिग्री अनुभव देण्यासाठी ऑडिओ, व्हिडिओ आणि मजकूराच्या मिश्रणासह 11 भाषांमध्ये परस्पर संवादासाठी उपलब्ध होणार आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर AI चा प्रभाव खूप मोठा असणार आहे आणि तिथेच अंबानी यांच्या हनुमानाचे विशेष स्थान असणार आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स