4 March 2024

आता चार वर्षांनी मिळेल ही संधी, नाकारली तर भरावा लागेल दंड

Mahesh Pawar

दर चार वर्षांनी लीप वर्ष येते हे सर्वाना माहित आहेच. पण, तुम्हाला माहित आहे का लीप इयरच्या दिवशीही प्रपोज डे देखील साजरा केला जातो.

प्रपोज डे च्या दिवशी मुले मुलींना प्रपोज करतात, तर लीप इयरच्या दिवशी मुली मुलांसमोर आपले प्रेम व्यक्त करतात.

यादिवशी मुली विशेषत: लाल रंगाचे स्कर्ट घालतात. जेणेकरून मुलगी आज तिच्या भावना व्यक्त करणार आहे याचे संकेत मिळतात.

एखाद्या मुलीने तिला आवडणाऱ्या मुलासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि त्याने नकार दिला तर मुलाला दंड द्यावा लागतो.

जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला प्रपोज करते तेव्हा तिला त्याच्याकडून अंगठीची अपेक्षा असते.

पण, मुलाने तिचा प्रस्ताव नाकारला तर दंड म्हणून मुलाला प्रपोज करणाऱ्या मुलीला 12 जोड्या हातमोजे द्यावे लागतात.

हातमोजे देण्यामागचे कारण म्हणजे तिची रिकामी अनामिका कोणालाही दिसू नये.

आयर्लंडमध्ये लीप वर्षाच्या अखरेच्या दिवशी म्हणजेच 29 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जातो.

आयर्लंडच्या सेंट पॅट्रिक यांनी मुली आणि स्त्रियांनाही मुले आणि पुरुषांना प्रपोज करण्याची संधी मिळायला हवी असे म्हटले होते.

त्यानंतर 1288 मध्ये स्कॉटलंडमध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला. यानुसार 29 फेब्रुवारीला महिला त्यांच्या भावना पुरुषांसमोर व्यक्त करू शकतील.

लीप इयरच्या दिवशी जर एखाद्या मुलीने मुलासमोर तिच्या भावना व्यक्त केल्या तर तो तिचा प्रस्ताव नाकारू शकत नाही, असे या कायद्यात लिहिले आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स