22 February 2024

ऑनस्क्रीन रोमान्स, ही नवी जोडपी माजवणार बॉलीवूडमध्ये खळबळ

Mahesh Pawar

आगामी बॉलीवूड चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना पहिल्यांदाच नवीन जोडपी ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहायला मिळणार आहेत.

डॉन सिरीजच्या तिसऱ्या म्हणजेच डॉन - ३ मध्ये रणवीर सिंगसोबत कियारा अडवाणी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि दिशा पटानी यांचा योद्धा रिलीजसाठी सज्ज आहे. 15 मार्चला योद्धा रिलीज होणार आहे.

कार्तिक आर्यनसोबत या वर्षातला उत्सुकता वाढविणारा सिनेमा भूल भुलैया 3 मध्ये तृप्ती डीमरी दिसणार आहे.

दिग्दर्शक अनुराग बसूच्या मेट्रोमध्ये आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान दिसणार आहेत. 29 मार्च 2024 रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.

शाहिद कपूर आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. 'देवा' चित्रपटात ही जोडी दिसणार आहे.

'देवरा' चित्रपटामधून जान्हवी कपूर साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत ती दिसणार आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स