26 February 2024

खतरनाक कैद्यांनी भरली आहेत 'या' दहा देशातील तुरुंग, भारताचा नंबर कितवा?

Mahesh Pawar

या 10 देशांच्या तुरुंगांमध्ये सर्वाधिक कैदी आहेत. या देशांची नावे वाचून तुम्ही थक्कच व्हाल.

इराण : या यादीत इराण दहाव्या क्रमांकावर आहे. येथील कारागृहात एकूण 1 लाख 89 हजार कैदी आहेत.

मेक्सिको : कैद्यांच्या बाबतीत हा देश 9 व्या क्रमांकावर आहे. येथील तुरुंगात 2 लाख 34 हजार 324 लोक बंद आहेत.

थायलंड: तुरुंगात 2 लाख 62 हजार 319 कैद्यांसह हा देश या यादीत 8 व्या क्रमांकावर आहे.

इंडोनेशिया: इंडोनेशियाच्या तुरुंगात एकूण 2 लाख 67 हजार 149 कैदी आहेत आणि ते यादीत 7 व्या क्रमांकावर आहे.

या यादीत तुर्कि देश सहाव्या क्रमांकावर आहे. येथील कारागृहात 3 लाख 41 हजार 497 कैदी आहेत.

रशियाच्या तुरुंगात 4 लाख 33 हजार कैदी आहेत. या यादीत हा देश पाचव्या स्थानावर आहे.

एकूण 5 लाख 73 हजार 220 लोक भारतीय तुरुंगात बंद आहेत. यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील देश आहे. येथील कारागृहात एकूण 8 लाख 39 हजार 672 कैदी आहेत.

एकूण 16 लाख 90 हजार कैद्यांसह चीन यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेच्या तुरुंगात 17 लाख 67 हजार 200 कैदी आहेत आणि ते यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स