28 February 2024

या 5 राशींना शनीची वाईट नजर पुढील 10 महिने त्रास देऊ शकते, घ्या अशी काळजी

Mahesh Pawar

शनिदेवाने 2023 साली कुंभ राशीत प्रवेश केला आहे. सध्या शनी या राशीत विराजमान आहे.

मार्च महिन्यापासून ते वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत शनिदेव कुंभ राशीतच असतील.

कुंभ राशीत शनिदेवाच्या उपस्थितीमुळे काही राशींसाठी चांगले तर इतर राशींसाठी वाईट असणार आहे.

शनिदेव नेहमीच वाईट प्रभाव पाडत नाही. काही वेळा तो चांगला परिणामही देतो.

पण, काही राशींना मार्च ते डिसेंबर या काळात काळजी घ्यावी लागेल.

ज्योतिषांच्या मते शनिदेव कुंभ राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मकर राशीवर शनीची वक्र दृष्टी असेल.

या राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असेल. तर, कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर शनीचा प्रभाव राहील.

शनीची साडेसाती आणि धैया या 5 राशींना त्रास देऊ शकतात. यामुळे त्यांचा जीवनात अनेक समस्याही येऊ शकतात.

शनीची चाल वाईट असते तेव्हा करिअर, आर्थिक आणि प्रेम जीवनात चढ-उतार येतात. तसेच वाईट काळाचाही सामना करावा लागतो.

शनीची साडेसाती आणि धैयाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. हनुमानजीची पूजा करावी.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स