4 March 2024

स्त्रियांनी गळ्यात देवाचे लॉकेट गळ्यात घालावे का? काय सांगते शास्त्र? घ्या  जाणून

Mahesh Pawar

मानवी जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीचे वास्तुशास्त्रात स्पष्टीकरण दिलेले आहे.

देवाचे लॉकेट खूप शुभ मानले जाते. म्हणूनच बहुतेक लोक ते घालतात. पण, महिलांनी देवाचे लॉकेट गळ्यात घालावे की नाही?

ज्योतिषशास्त्र नियमांनुसार एखाद्या व्यक्तीने गळ्यात फक्त तेच परिधान करावे जे त्याच्यासाठी शुभ आहेत. अन्यथा, ते त्यांच्या ग्रहांना हानी पोहोचवू शकते.

हिंदू धर्म शास्त्रानुसार देवाचे लॉकेट किंवा देवाशी संबंधित कोणताही फोटो अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे त्यांना कधीही अपवित्र ठिकाणी ठेवू नये.

ज्योतिष शास्त्रात देवाचे लॉकेट घालणे निषिद्ध मानले आहे. कारण, व्यक्ती दिवसभर शुद्ध राहत नाही.

वॉशरूममध्ये जाण्यापासून अनेक अशुद्ध कामे करतो. अशा वेळी गळ्यात देवाचे लॉकेट घातल्यास ते शुद्ध राहत नाही.

अनेक वेळा नकळतपणे घाणेरडे किंवा खराब हात लॉकेटला स्पर्श करतात. त्यामुळे ते अपवित्र होते.

शास्त्रानुसार देवाचे लॉकेट धारण करून वैवाहिक संबंध ठेवल्यास त्याचा ग्रहांवर प्रभाव पडतो.

शास्त्रानुसार महिलांनी गळ्यात देवाचे लॉकेट घालणे टाळावे. याशिवाय त्यांनी देवाशी संबंधित कोणतीही वस्तू नेहमी सोबत ठेवू नये.

महिलांनी मासिक पाळी काळात चुकूनही देवाचे लॉकेट घालू नये. यामुळे त्यांच्या ग्रहातील दोष वाढतात. त्यांचे आरोग्य बिघडते.

अशा काळात सकारात्मक शक्ती नष्ट होते आणि अशुद्ध लॉकेट घातल्याने नकारात्मकता पसरते.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स