29 February 2024
Mahesh Pawar
भारतामध्ये असे एक गाव आहे जे प्रेम विवाहासाठी प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे गावं महाराष्ट्रातच आहे.
प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्यांसाठी हे गाव खास संदेश देते. कारण, या गावात जवळपास सर्व धर्माचे लोक राहतात.
या गावातील बहुतांश लोकांनी आंतरजातीय प्रेमविवाह केले आहेत. अगदी सरपंच, उप सरपंच ते राज्याचे एक माजी मंत्री यांनीही प्रेम विवाह केला आहे.
गेल्या चार दशकांपासून या गावात प्रेमविवाहाची परंपरा सुरू असून आतापर्यंत दोनशेहून अधिक प्रेमविवाह झाले आहेत.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कांजरी हे ते गाव आहे.
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे याच गावातील आहेत. त्यांनीही प्रेमविवाह केला आहे.
गावात तंटा मुक्त समिती आहे जी वाद मिटवण्याचे तसेच जोडप्यांचे प्रेमविवाह लावून देण्याचे काम करते.
जोडप्याने कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणून ही समिती कुटुंबातील सदस्यांना सल्ला देते.
कुटुंबाच्या आणि जोडप्याच्या संमतीनंतर गावातील मंदिरात किंवा ग्रामपंचायतीत लग्न लावले जाते.