19 February 2024

संबंध ठेवायचे नाही असे बोलणाऱ्या व्यक्तीचा फोन आल्यावर काय कराल?

Mahesh Pawar

अनेकदा आपल्याला काहीही न सांगता सावरता लोक बोलणं बंद करतात.

त्यापेक्षा समोरून थेट सांगितले म्हणजे स्पष्टता दिसून येते.

कधी कधी कारण योग्य/अयोग्य असतील, तरी ही त्यांचा मान ठेवून बोलणे बंद करणे सोयीचे असते.

त्या व्यक्तीचा समोरून फोन आल्यावर हुरळून जाऊ नये किंवा कोरडे ही नसावे.

संबंध ठेवायचे नाही असे  स्वतः सांगून फोन करत आहेत म्हणजे परिस्थिती बदलली आहे असे समजावे.

समोरच्यांचे पूर्ण बोलणे ऐकून ते समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्यांनी फोन केला आहे.

गरज आहे म्हणून फोन आला तर नीट विचार करून मदत करायची किंवा नाही ते ठरवावे.

मदत करणे शक्य नसेल तर सौम्य शब्दात नाईलाज कळवावे, दिलगिरी व्यक्त करावी.

कधीतरी काही महत्वाचे सांगायला/ कळवायला फोन केला असेल ही शक्यता आहे.

कधी कधी परिस्थिती गैरसमज निर्माण करते. त्यामुळे चांगली नाती/मित्र गमावतो. तेढ सोडवा, नाती जपा.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स