5 March 2024

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी

Mahesh Pawar

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगची चर्चा अजूनही सुरूच आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नानंतर त्यांच्या वनतारामध्ये काही दिवस राहणार आहेत.

वनतारा हा अनंत अंबानी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

वनतारा हे जगातील सर्वात मोठे बचाव केंद्र आहे. जामनगरमध्ये 3000 एकरमध्ये ते विकसित करण्यात आलेय.

वनतारा अंबानी पुनर्वसन केंद्रामध्ये जखमी जनावरांसाठी 650 एकर जागेवर बचाव आणि पुनर्वसन केंद्र बांधले गेले आहे.

हत्तींना आंघोळीसाठी येथे मोठे जलाशय बांधण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत येथे 200 हून अधिक हत्ती आणि इतर हजारो प्राण्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.

वनतारामध्ये मगरी, बिबट्या आणि गेंडा यांसारख्या प्रमुख प्रजातींच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स