28 February 2024
Mahesh Pawar
हॉटेलमध्ये लाल, पिवळा, निळ्या रंगाची बेडशीट वापरता आली असती पण पांढऱ्या रंगाची बेडशीट घालण्याचे कारण काय?
ट्रेनमध्येही फक्त पांढऱ्या बेडशीटचा वापर केला जातो. याशिवाय प्रवाशांना पांघरूण म्हणूनही पांढरी चादर दिली जाते.
पांढरी चादर देण्याचे कारण म्हणजे हा रंग पाहिल्यानंतर मन शांत होते. मनातला तणाव दूर होतो.
हॉटेलच्या खोलीत जातो तेव्हा पांढरा रंग पाहिल्याने सकारात्मक व्हायब्स येतात. यामुळे आराम वाटतो आणि चांगली झोप येते.
याशिवाय पांढऱ्या चादरीवर डाग अगदी स्पष्टपणे दिसतात. त्यामुळे हॉटेलमध्ये स्वच्छ आहे की नाही हे लगेच कळते.
स्वच्छ पांढरी चादर असेल तर हॉटेल व्यावसायिकांची प्रतिष्ठा कायम राहते. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते.
पांढऱ्या चादरी पहिल्यांदा पाश्चात्य हॉटेल्समध्ये वापरल्या जात होत्या. पुढे अनेक देशांनी त्याचे अनुकरण करायला सुरवात केली.