लिंबू सरबत बनवता ही चूक करु नका, अन्यथा...

लिंबू सरबत बनवता ही चूक करु नका, अन्यथा...

28th April 2026

Created By: Aarti Borade

अनेकदा घरी बनवलेल्या सरबताची चव बाजारातील सरबासारखी लागत नाही, कारण ती बनवताना आपण काही चुका करतो

सर्वात मोठी चूक म्हणजे थंड पाण्यात थेट साखर टाकणे, कारण ती विरघळायला वेळ लागतो

उत्तम चवीसाठी साखरेचा आधी घट्ट पाक किंवा 'शुगर सिरप' बनवून घ्यावा, ज्यामुळे सरबत झटपट तयार होते

मिक्सरमध्ये लिंबाचा रस, काळे मीठ, पुदीना, बर्फाचे तुकडे आणि साखरेचा पाक एकत्र करून ब्लेंड केल्यास छान चव येते

ब्लेंड करताना लिंबाच्या सालीचा एक छोटा तुकडा टाकल्यास शिकंजीला एक वेगळा आणि फ्रेश सुवास मिळतो

हे सर्व मिश्रण थंड पाण्यात मिसळल्यास तुम्ही अगदी घरच्या घरी बाजारासारखी चविष्ट लिंबू सरबत एन्जॉय करू शकता