योगासने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासने उत्तम मानली जातात.
21 June 2025
वजन कमी करण्यासाठी योगासने फायदेशीर आहे. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते. मसल्स मजबूत होतात.
वजन आणि बेली फॅट कमी करण्यासाठी कोणती योगासने करावी, जाणून घेऊ या.
धनुरासनामुळे मसल्स सक्रीय होतात. हे आसन केल्यावर शरीर धनुष्याच्या आकारासारखे दिसते. पचन चांगले होते.
सूर्यनमस्कार केल्याने अनेक आसनांचे फायदे मिळतात. यामुळे चयापचय वाढतो आणि शरीर लवचिक बनते.
पश्चिमोत्तानासन केल्याने स्नायू मजबूत होतात. पचन सुधारुन पोटाची चरबी कमी होते.
सेतू बंधासन हे आसन हाडे मजबूत करते. पचन सुधारते आणि चयापचय वाढवते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते.
उष्ट्रासन केल्याने शरीर ताणले जाते, पचन सुधारते आणि पोटाची चरबी कमी होते.
भुजंगासन केल्याने पचनक्रिया चांगली होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.