अंडी खाल्ल्याने खरंच वजन वाढते का?
2 November 2025
Created By: Mayuri Sarjerao
अंडी आरोग्यासाठी वरदान मानली जातात
अंड्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन बी 2, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन D,व्हिटॅमिन E,व्हिटॅमिन B6 असते
अंड्यांमध्ये प्रथिने असतात, जी स्नायूंच्या निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. शरीराला ऊर्जा प्रदान करतात
अंडी खाल्ल्याने वजन किंवा कोलेस्टेरॉल वाढते, अशा अनेक समजुती आहेत.
पण आहार तज्ज्ञाच्या मते अंडी खाल्ल्याने वजन वाढत नाही
अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत, जे जास्त काळ पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते
बटर, तेल किंवा मसाल्यात अंडी करण्यापेक्षा उकडलेली अंडी हा एक चांगला पर्याय मानला जातो
अंड्यांचा दर्जा आणि प्रमाण देखील महत्त्वाचे आहे. योग्य स्त्रोताकडून अंडी खरेदी करणे महत्त्वाचे
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच;
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा