सकाळी वा संध्याकाळी नव्हे,दुपारी एक ग्लास दूध प्यायल्याने मिळतात एवढे फायदे  

5 February 2025

Created By : Manasi Mande

छोटे असोत किंवा मोठे लोक, दूध पिणं प्रत्येकाला आवडतं, सगळ्यांसाठी तो उत्तम आहारही मानला जातो.

लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी दूध महत्वाचं ठरतं. तर मोठ्यांची हाडंही दूध प्यायल्याने मजबूत होतात.

काही लोकं सकाळी उठल्यावर तर काही रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. पण दुपारी दूध प्यायल्याने काय फायदा मिळतो  ?

डाएटिशियन मोहिनी डांगरेंच्या सांगण्यानुसार,दुपारी दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत. दुपारी दूध प्यायल्यास ते सहज पचतं आणि मेटाबॉलिज्मही वाढतं.

दुधात कॅल्शिअमसह फॉस्फर, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन असतं, जे हाडांच्या मजबुतीसाठी गरजेचं असतं.

दूध प्यायल्याने स्ट्रेस फ्री राहण्यात मदत होते.

ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असते, त्यांनी रोज एक ग्लास दूध पिणं महत्वाचं ठरतं.