‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..! 

5 December 2023

Created By : Mahesh Pawar

आपण कोणीतरी खास आहोत. आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत. 

आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते असे भ्रम अनेकांना झालेले असतात.

आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली या भ्रामक कल्पना ते जपत असतात. 

आपला ईगो कुरवाळत असताना कुणाशी शत्रुत्व आले तरी चालते. 

माणसे तुटली तरी चालतील पण ‘ईगो’ तुटता कामा नये असा यांचा व्यवहार असतो.

ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते, तेच उंच भरारी घेऊ शकतात.

आयुष्यात एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा.. त्याला सोडून द्या...