स्वार्थी लोक प्रत्येकवेळी स्वतः चा फायदा कसा बघतात?

5 December 2023

Created By : Mahesh Pawar

प्रत्येक वेळी स्वतःचा फायदा बघून व्यवहार करणारे लोक स्वार्थी असतात.

ऐक ना एक दिवस हे स्वतःच फसतात आणि स्वार्थाने कमवलेलं एकदाच घालवतात.

यांचे वागणे ठराविक काळापर्यत थांबलं नाही तर हे लोकं स्वतःच अडकतात.

स्वार्थ किती करावा याला ही मर्यादा असाव्यात सगळेच दिवससारखे नसतात.

प्रत्येक वेळी फायदा बघणारे एके दिवशी स्वतःचाच तोटा करून घेतात.

हे हुशार नसतात फक्त तसा आव आणतात. समोरच्याला दिशाभूल करून फसवतात.

स्वार्थी लोकं हुशार आहेत असे वाटत असेल तर ते पहिलं डोक्यातून काढा.

या लोकांच्या बुद्धीची चाचणी घेतली तर कळते की यांना व्यवहार ज्ञान शून्य असते.