नवीन आणलेला दगडी खलबत्ता थेट कधीच वापरायचा नाही
18 November 2023
Created By: Swati Vemul
आधी खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घ्या
तारेच्या घासणीने खलबत्ता नीट घासून घ्यायचा
घासणीने खलबत्त्याची खर निघते
त्यानंतर मूठभर भिजवलेले तांदूळ आणि थोडं पाणी घालून वाटत राहायचं
बत्त्यासह ते वाटलेलं तांदूळ सगळीकडे नीट लावून घासून घ्यायचं
त्यानंतर खलबत्ता पाण्याने धुवून घ्यायचा
आता सुकलेलं खोबरं गॅसवर गरम करून घ्यावा
खोबरं आणि थोडं मीठ त्या खलबत्त्यात नीट चेचून घ्यायचा
सगळीकडून ते खोबऱ्याचं वाटण नीट लावून घासून घ्यायचं
खलबत्ता पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवायचा
शेवटच्या टप्प्यात खलबत्त्याला हळद आणि तेलाचा लेप लावावा
हळदीचा लेप खलबत्त्याला रात्रभर लावून ठेवावा
सकाळी तो खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून वापरायला घेऊ शकता
नाना पाटेकरांनी ज्याला मारलं, त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा