नकली मावा कसा ओळखावा?

30th September 2025

Created By: Aarti Borade

सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे, ज्यामध्ये मावा हा महत्त्वाचा घटक आहे

पण बाजारात नकली मावा विकला जाऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे

असली माव्याची ओळख करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत

असली मावा दाणेदार, थोडा खरखरीत आणि गोड वास येणारा असतो

नकली माव्यात स्टार्च किंवा मैदा मिसळलेला असू शकतो, जो चिकट आणि गंधहीन असतो

माव्याची गुणवत्ता तपासण्यासाठी तुम्ही तो गरम पाण्यात मावा विरघळवून पाहू शकता