महिलेने कसं कमी केलं  आपलं वजन? शेअर केला  डाएट प्लान. PC: Fitness_with_ housewife/insta

वजन कमी करणं चॅलेंजिंग  पण फिटनेस अशक्य नाही.  महिलेने असं कमी केलं  19 किलो वजन.

हाऊस वाईफ आणि फिटनेस ट्रेनर (सोशल मीडिया बायो) पूजाने तिचं वजन 76 वरुन  57 किलोवर आणलं. 

पूजाने इंटरमिटेंट फास्टिंग फॉलो केलं. त्यात ती 16 तास उपवास आणि 8 तास खाण्यासाठी ठेवायची. 

पूजा पहाटे 5 वाजता उठून कोमट पाणी प्यायची. दिवसभरात 4 लीटर  पाणी प्यायची. 

पूजा दिवसातला पहिला मील दुपारी 12 वाजता घ्यायची.  त्यात दूधा बरोबर  मुसळी असायची. 

दुपारी 2.30 वाजता 1 चपातीसोबत पनीरची भाजी आणि सॅलेड खायची.

पूजा संध्याकाळी 4 वाजता मिक्स फ्रूट ज्यूस प्यायची.  त्यात शुगर नसायची.

फास्टिंग म्हणजे उपवासाची वेळ सुरु होण्याआधी संध्याकाळी 6.30 वाजता  मिक्स वेजिटेबल डोसा आणि  सांभार घ्यायची. 

वेट लॉससाठी तिने डाएटमध्ये ग्रीन टी चा समावेश केलेला. झोपण्याआधी ती हा  ग्रीन टी प्यायची.