उष्ण वातावरणात पित्त दोष उसळत असतो. त्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो. जळजळ होते,त्वचेवर लाल चट्टे उमटतात, खाज येते आणि पिंपल्स देखील येतात.
पित्त दोषाला बॅलन्स करण्यासाठी कुलिंग आणि हायड्रेटिंग इफेक्ट होण्यासाठी काही पेय फायदेशीर ठरतात. यामुळे शरीराची उष्णता कमी होते आणि पाचक अग्नि नीट होतो.
उन्हाळ्यातील सुपर ड्रींक सत्तूचे पाणी पोटातील उष्णता शांत होते. आपला पीएच देखील बॅलन्स होतो. पित्ताची लक्षणं कमी होतात.हे मेटाबॉलिक रेट वाढवण्यास मदत करते.
ताकाचा गुणधर्म थंड असतो. हे पचनाला धीमे करते. त्यामुळे जेवण ठिक आणि योग्य प्रकारे पचते.त्यामुळे ताक पोटातील उष्णता कमी करते.
पोटासाठी बडीशेप वरदान आहे. बडीशेपचा गुणधर्म हा थंड असतो. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे पाणी रोज प्यायल्याने पित्त दोष बॅलन्स होतो.
उन्हाळ्यात पित्त दोष बिघडू नये यासाठी हायड्रेशन लेव्हलला ठीक ठेवणे गरजेचे असते. यात इलेक्ट्रोलाईट्सचा रोल महत्वाचा असतो. यामुळे नारळ पाणी पिणे महत्वाचे असते. नारळ पाणी शरीराला हायड्रेट राखते.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काकडीचे पाणी प्यायल्याने पोटही शांत होते. त्यामुळे रोज काकडीचा ज्यूस किंवा पाणी प्यावे.