टॉन्सिल्स हे संसर्गापासून वाचवण्याचे काम करतात.

टॉन्सिलला सूज आल्यानंतर त्याच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय नक्की करु शकता.

मध आणि हळद दुधात मिसळून प्यायल्याने यापासून आराम मिळू शकतो.

टॉन्सिलला सूज आली असेल तर तोंडात काही लवंगा ठेवा,

सर्वप्रथम तुळशीची पाने धुवा, नंतर ही पाने पाण्यात उकळा, नंतर गाळून घ्या, कोमट झाल्यावर प्या

टॉन्सिल दुखत असेल तर मिठाच्या पाण्याने गार्गल करू शकता.

टॉन्सिलचा त्रास अधिक काळापासून असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.