हाय ब्लडप्रेशर आहे तर डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा 

14 May 2025

created by : अतुल कांबळे 

जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे तर आहारात हा बदल करा

घरी बनवलेले अन्न खा, घरचे अन्न ताजे आणि कमी कॅलरीचे असते. त्यात पोषक तत्वे असतात. घरच्या जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी असते

फायबर जादा असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने हायपर टेन्शन कमी होते.

सर्व प्रकारच्या प्रोसेस्ड आणि पाकिटबंद पदार्थात सोडीयमचे प्राण जादा असते. त्याने ब्लडप्रेशर वाढते म्हणून असे पदार्थ टाळावेत

सोडियम एक प्रकारचे इलेक्ट्रोलाईट आहे. ज्यास पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाईट्समुळे ते संतुलित केले जाते.

 पोटॅशियमसाठी हिरव्या पालेभाज्या,केळी, रताळी, ऑर्गेनिक डेअरी प्रोडक्ट्स, बीन्स आणि एव्हाकोडो फूड्समध्ये पोटॅशियमचे प्रमाण जादा असते.

जास्त पाणी प्यावे त्यामुळे शरीर हायड्रेट राहील, तर शरीर हायड्रेट राहीले तर फ्लुईड लेव्हल बॅलन्स होते.