एखाद्या व्यक्तीला आवडत असाल तर तिच्या वागण्या बोलण्यातुन कसे समजून घ्याल?
30 November 2023
Created By : Mahesh Pawar
एखाद्याबद्दल मनात निर्माण झालेली आवड ही भीती, राग, मत्सर, द्वेष आणि तिरस्कार या भावनांविरुद्ध आहे.
ती व्यक्ती नजरेच्या टप्प्यात, आसपास, जवळ असेल तर नकळतपणे समोर येते. पाठ दाखवत नाही.
आपल्यासोबत आरामशीर नजरभेट करते. आपण पाहता नसलो तरी ती मात्र आनंदी, उत्सुक चेहऱ्याने पाहते.
उभे असताना किंवा बसलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीची पाऊले आपल्या शरीराच्या दिशेला नकळतपणे वळतात.
ती व्यक्ती नकळतपणे हातवारे करते, प्रसंगी हाताने स्पर्श करायचा प्रयत्न करते.
ती व्यक्ती आपल्यासोबत घाईगडबडीत आणि उगीचच आपल्याच कामात असत नाही.
स्वतःहून प्रसंगानुसार आणि वेळ काढून आस्थेवाईकपणे विचारपूस, चौकशी करते.
तुमच्यासमोर बोलताना निंदा, थट्टामस्करी, कुचाळक्या आणि भलतेसलते विनोद करत नाही.
ती व्यक्ती आपल्या समोर असल्यावर किंवा आल्यावर टाळायचा, दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत नाही.
आपल्यावरील विश्वास वाढल्यानंतर ती वेळ काढून वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारते.
हे सुद्धा वाचा | सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?