कलिंगडाच्या फोडीवर मीठ टाकून खाणे योग्य आहे का?

 22  April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

कलिंगडामध्ये प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए आणि सी सारखे अनेक पोषक घटक आढळतात.

कलिंगडामध्ये 90 टक्के पाणी असतं. उन्हाळ्यात दररोज कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते

अनेकांना कलिंगडाचे तुकडे करून त्यावर मीठ टाकून खायला आवडतं, पण ते योग्य आहे का?

जयपूरचे आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता म्हणतात, कोणत्याही फळावर मीठ टाकून खाल्ले तर त्याचे फायदे मिळत नाही

कलिंगड कापून मीठ न घालता लगेच खाल्ले तर ते जास्त फायदेशीर ठरते. शरीराला पोटॅशियमचे प्रमाण चांगले मिळेल

कलिंगडामध्ये फायबर आढळते. त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस आणि अतिसार या समस्यांपासून आराम मिळतो

तज्ज्ञांच्या मते, मीठ टाकून कोणतेही फळ खाऊ नये. यामुळे त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते.