गरोदर महिलांनी घ्यावी ही काळजी

09 November 2023

Created By : Manasi Mande

लोकप्रिय मल्ल्याळम अभिनेत्री डॉ प्रियाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ती 8 महिन्यांची गरोदर होती.

कार्डिॲक अरेस्टमुळे तिचा अकस्मात मृत्यू झाला. पण तिच्या बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

महिलांमधील हार्मोन्स त्यांच्या हृदयाचे संरक्षण करतात असे मानले जाते. पण आता हृदयविकारामुळे महिलांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढले.

प्रेग्नन्सीमध्ये कार्डिॲक अरेस्ट खूप दुर्मिळ असतो. पण एखाद्या महिलेला आधीपासूनच आजार असेल तर कार्डिॲक अरेस्ट येऊन शकतो.

प्रेग्नन्सीमध्ये महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात. 20 व्या आठवड्यानंतर ब्लड प्रेशर वाढल्यास हायपरटेन्शन आणि Preeclampsia चा त्रास होऊ शकतो.

Preeclampsia म्हणजे ब्लड प्रेशर  वाढणं आणि लघवीत प्रोटीन्स येणे. यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो.

ज्या महिलांना Preeclampsia चा त्रास असतो, त्यांना डिलीव्हरीनंतर 10 वर्षांच्या आता हार्ट ॲटॅक येण्याचा धोका चौपट जास्त असतो.

गरोदरपणात हृदय मजबूत ठेवण्यासाठी मीठ कमी खावे. तसेच गरोदरपणात इंटेन्स वर्कआऊट करू नये.  

गरोदरपणात योगासनं, हलका व्यायाम, मेडिटेशन करा आणि कमीत कमी अर्धा तास चालावे.

तसेच पौष्टिक आहाराचे सेवन करावे. आणि डॉक्टरांच्या नियमित संपर्कात रहावे.

सारा की सारा तेंडुलकर ? शुबमन नक्की कोणत्या साराला करतोय डेट ?