25 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
लठ्ठपणाची समस्या अलिकडे वाढली आहे. लोक बारीक होण्यासाठी जिममध्ये अनेक तास घालवत आहेत.
जर तुम्ही बेली फॅटने त्रस्त असाल तर काही पेयं सकाळी पिऊ शकता. त्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन चरबीही वितळेल.
मध आणि लिंबूचे पाणी अनेक लोक सकाळी पितात. या पाण्याने शरीर हायड्रेट होते, बॅली फॅट कमी होते. यात व्हिटामिन सी असते.
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबूचा रस मिक्स करा. हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या.
जिऱ्याचे पाणी देखील चरबी कमी करते. जिऱ्यात फायबर, व्हिटामिन्स ए,सी, ई, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते.
जिरे एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजवा, सकाळी गाळून हे पाणी कोमट करुन प्या
दालचिनीचे पाणी देखील पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. दालचिनीत सिनामाल्डिहाईड नावाचे तत्व असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर असते
दालचिनी रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवा, आणि हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्या. दालचिनीचा चहा देखील बनवून प्या.
( डिस्क्लेमर - ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य सल्ल्यासाठी डॉक्टरांना भेटा )