हाय ब्लड शुगरची ही लक्षणे वेळीच ओळखा, व्हा सावध  

Created By: Atul Kamble

 24 january 2026

सध्याची खराब जीवनशैलीमुळे अनेकांना डायबिटीजचा धोका ऐन तारुण्यात होत आहे.या आजारावर उपचार नाही.यावर केवळ योग्य औषध आणि आहाराच उपचार आहे. 

 डायबिटीजमध्ये ब्लड शुगर नियंत्रित होणे गरजेचे असते.डायबिटीज दोन प्रकारचे असतात.

 आज आपण हाय ब्लड शुगरची लक्षणे पाहणार आहोत, वेळीच त्यावर लक्ष देऊन सावध होऊ शकता.

एखादी जखम जर लवकर बरी होत नसले तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा

हातपायात वारंवार झिणझिण्या येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका, डॉक्टरांना दाखवा

 काम केल्यानंतर थकवा येणे नॉर्मल आहे. पण काम न करताही जर वारंवार थकवा येत असेल तर हायब्लड शुगर येऊ शकतो.

जर वारंवार पाण्याची तहान लागत असेल इग्नोर करु नका,कदाचित रक्तात साखर वाढलेली असू शकते.

जर तुम्हाला हेल्दी लाईफ जगायचे असेल तर डाएटमध्ये सकस पदार्थांचा समावेश करा,व्यायाम करा.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )

या देशात जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास व्हायची कठोर शिक्षा, मृत्यूदंडाचीही तरतूद