उन्हाळ्यात पाणी तांब्याच्या भांड्यात प्यावे की मातीच्या?

15 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. यासाठी भरपूर पाणी आणि आरोग्यदायी पेये प्यावीत.

लोक मातीच्या आणि  तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी पितात. पण उन्हाळ्यात कोणत्या भांड्यात पाणी पिणे जास्त फायदेशीर?

आयुर्वेदात, मातीच्या भांड्यात पाणी ठेवणे सर्वोत्तम मानले जाते. कारण त्यात कोणतेही रसायने नसतात.

मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीराची पीएच पातळी संतुलित राहते.पचनसंस्था सुधारते.

तर तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते.

पण उन्हाळ्यात मातीच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी पिणे अधिक फायदेशीर असते

तांब्याच्या भांड्यात जास्त पाणी प्यायल्याने दात कमकुवत होऊ शकतात. कधीकधी पोटदुखी, उलट्या, जुलाब, डोकेदुखी, असे त्रास होऊ शकतात.

ज्या लोकांना कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या आहे त्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यापूर्वी आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.