प्रत्येकाला माहित असावेत असे काही लाइफ हॅक्स (Life Hacks)
6 December 2023
Created By : Mahesh Pawar
एखाद्याला दोनपेक्षा अधिक वेळा कॉल करू नये.
एसटीने प्रवास करताना महिला उभी असेल तर महिला आरक्षित जागेवर बसू नये.
रागात असल्यावर बोलण्याचे भान राहत नाही. गेलेले शब्द इतरांच्या मनावर जखम करतात.
व्यवहार हा प्रतिमेचा आरसा आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळावा.
आपल्याकडून काही काम होत नसेल तर स्पष्ट सांगावे. दुसऱ्याला आशेवर ठेवू नये.
टीव्हीवरील सौंदर्य प्रसाधने बघून उगीचच आपले पैसे घालवू नये.
जे सौंदर्य आपल्याला जन्माने मिळाले आहे तेच आयुष्यभर कायम राहणार आहे.
हे सुद्धा वाचा | सर्वात वाईट भावनिक स्थिती कोणती आहे?