किडनी आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे किडनीचे आरोग्य राखणे गरजेचे असते. मात्र, आपल्या काही सवयी किडनीचे आरोग्य खराब करतात
सकाळी उठल्यानंतर लागलीच पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता दूर होते. शरीरात पाणी कमी झाल्यास किडनीवर जास्त प्रेशर येते आणि तिची कार्यक्षमता घटते.
नाश्त्यात जास्त मिठाचे पदार्थ खाणे म्हणजे सोडियमचे प्रमाण वाढते.ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि किडनीवर जास्त दबाव येतो.
लघवी रोखून धरल्याने देखील युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन वाढू शकते. त्यामुळे हे इन्फेक्शन किडनीपर्यंत पोहचते
जास्त चहा आणि कॉफी प्यायल्याने धोका वाढतो.यात कॅफीन जास्त असते. कॅफीन डाययुरेटिक असते. ती शरीरातील पाणी काढते. त्यामुळे किडनीला जास्त काम करते. आणि डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.
सकाळचा नाश्ता न केल्याने आणि योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर न घेतल्याने शरीरात टॉक्सिन्स जमते. बाहेर टाकण्यास किडनीला जास्त श्रम पडतात. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळू नये.
या सवयी अंगी बाणवल्या तर किडनीच्या कार्यशैलीत फरक पडतो आणि ती दीर्घकाळ टीकते.
वजन कमी करायचे असेल तर या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा...