उन्हाळ्यात कलिंगडाच्या बियाही ठरतात फायदेशीर

24 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

कलिंगडमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी6 सारखे पोषक घटक आढळतात

उन्हाळ्यात कलिंगड शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि पचन सुधारते

आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता म्हणतात कलिंगडाच्या बियाही तेवढ्याच फायदेशीर असतात

कलिंगडाच्या बियांमध्ये कॅलरीज कमी असतात, मॅग्नेशियम, लोह, जस्त सारखे पोषक घटक असतात

कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने जळजळ कमी होण्यास मदत होते,मधुमेहातही ते फायदेशीर आहेत

जर कलिंगडाच्या बिया मऊ असतील तर तुम्ही 20 ते 25 बिया खाऊ शकता. पण त्या मर्यादित प्रमाणात खा

जर तुम्हाला कलिंगडाची ऍलर्जी असेल तर खाऊ नये. सेवन करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा