महिलांना कोणत्या गोष्टीचा सर्वात जास्त राग येतो, ज्यामुळे संसारही उध्वस्त होतात? 

6 December 2023

Created By : Mahesh Pawar

देशात महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं. त्या नोकरी करतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत.

पण, आजही त्यांना सनातनी, पुरुषप्रधान संस्कृतीचा सामना करावा लागतो आहे.

घरात दुय्यम वागणूक आणि बाहेर स्वातंत्र्य अशा विसंगतीमुळे महिलांना खूप राग येतो.

महिलेनं न थकता हसता इतरांची काळजी घ्यावी अशी सर्रास अपेक्षा असते. ज्याचं ओझं महिलेवर पडतं.

आता परिस्थिती बदलते आहे. त्या आपल्या भावना व्यक्त करू शकतात म्हणून राग वाढलेला दिसतो. 

महिलांमध्ये रागाचं प्रमाण कमी करायचं असेल तर त्यांना सहन करावे लागणारे त्रास दूर करावे लागतील. 

जेव्हा महिलांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो त्यावेळी तिचा संताप अनावर होतो.

मागचा पुढचा विचार न करता ती संसार मोडायलाही कचरत नाही.