रोज कच्ची भेंडी खाण्याचे फायदे काय?

20 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

भेंडीची भाजी पेक्षाही कच्ची भेंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत

कच्च्या भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. दररोज कच्ची भेंडी खाल्ल्यास काय होते जाणून घेऊया

न्यूट्रिशनिस्ट नमानी अग्रवाल म्हणतात की, भेंडीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि सोडियम असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते

कच्ची भेंडी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते. तिच्या सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन ,आम्लपित्तपासून आराम मिळतो

भेंडीमध्ये यूगेनॉल घटक आढळतो, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते

कच्ची भेंडी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते

कच्च्या भेंडीमध्ये पेक्टिन नावाचा घटक असतो, जो खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवतो