14 फेब्रुवारी 2025

कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?

कच्च्या कोरफडीमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, ई, बी12, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, सेलेनियम आणि 18 आवश्यक अमिनो एसिड असतं. या शिवायत अँटी इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल तत्त्वही असतात. 

कच्च्या कोरफडीत बरीच पोषक तत्त्व असतात. कोरफड खाल्ल्याने अनेक फायदे होतात. 

कोरफडीत एंजाइम असतात. त्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता, आम्लपित्त यासारख्या समस्या कमी होतात. 

कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिसेकेराइड्स असतात. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. संसर्गापासूनही संरक्षण होतं. 

कोरफड शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते. याचं सेवन केल्याने शरीर निरोगी आणि त्वचा चमकदार होते. 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोरफडीचे सेवन फायदेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

कोरफडीमुळे पचनसंस्था सुधारल्याने कॅलरीत लवकर बर्न होतात. तसेच वजनही कमी होण्यास मदत होते.

रस्त्यावर पडलेलं नाणं सापडलं तर कसले संकेत? जाणून घ्या