हाडांच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

30 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हाडांच्या पेशी असामान्यपणे वाढू लागल्यावर हाडांचा कर्करोग होतो. यामुळे हाडांची रचना खराब होते

जेव्हा हाडांमध्ये कर्करोग होतो तेव्हा शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात.

डॉ. रोहित कपूर स्पष्ट करतात की कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे हळूहळू वाढणारे हाडांचे दुखणे, जे विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही.

प्रभावित भागात सूज, गाठी किंवा कडकपणा हा हाडांच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतो

कर्करोग हाडे कमकुवत करतो, ज्यामुळे किरकोळ दुखापत झाली तरी फ्रॅक्चर होऊ शकते.

हाडांच्या कर्करोगात अनेकदा थकवा, अशक्तपणा आणि अचानक वजन कमी होणे, अशी लक्षणे देखील दिसून येतात

अशी काही लक्षणे जाणवत असतील तर लेगच डॉक्टरांचा सल्ला घ्या