तोंडातून दुर्गंधी येणे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

6 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

बऱ्याचदा लोकांना तोंडाच्या दुर्गंधीची समस्या असते, ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं. शरीरात लपलेल्या आजारांचे लक्षण देखील असू शकते.

पचन व्यवस्थित होत नसेल तर पोटात गॅस, बद्धकोष्ठता किंवा आम्लपित्तची समस्या असू शकते, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते.

पायोरिया हा हिरड्यांचा एक गंभीर आजार आहे ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते आणि तोंडातून तीव्र वास येतो

लाळेच्या कमतरतेमुळे तोंड कोरडे पडते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. या बॅक्टेरियामुळे दुर्गंधी येते.

जर यकृत योग्यरित्या कार्य करत नसेल तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडू शकत नाहीत. यामुळे तोंडातून तीव्र वास येऊ शकतो

मधुमेही रुग्णांमध्ये केटोन बॉडीजचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

जेव्हा मूत्रपिंड निकामी होते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. त्यामुळे श्वासातून आणि तोंडातून अमोनियासारखा वास येतो.