सतत तोंड येणे, व्रण येणे कोणत्या आजाराचे लक्षण आहे?

2 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

डॉ. सुभाष गिरी स्पष्ट करतात की जेव्हा शरीरात लोह, व्हिटॅमिन B12 कमी असते तेव्हा वारंवार तोंड येते

पोटातील आम्लाचे असंतुलन तोंडातील उष्णता वाढवते, ज्यामुळे अल्सर होऊ शकतात. यामुळे छातीत जळजळ, ढेकर येणे, मळमळ देखील होते

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे तोंडात वारंवार फोड येऊ शकतात

हा एक ऑटोइम्यून आजार आहे ज्यामध्ये इम्यून सिस्टम शरीराच्या निरोगी पेशींवर हल्ला करते. यामुळे तोंडात अल्सर, त्वचेवर पुरळ,सांधेदुखी होऊ शकते

पचनसंस्था नीट काम करत नसेल तरी देखील तोंडात सूज किंवा अल्सर होऊ शकतात

जर फोड वारंवार येत असतील आणि बराच काळ टिकत असतील किंवा रक्तस्त्राव सुरू झाला असेल ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या