भरवसा आणि विश्वास या दोन शब्दांमध्ये फरक काय?

19 December 2023

Created By : Mahesh Pawar

जीवन जगताना कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागतो.

रोजच्या भाषेत त्याला भरोसा (भरवसा) हा शब्द वापरतो.

"भरोशाच्या म्हशीला टोणगा" ही म्हण प्रचलित आहे.

पण, भरोसा हा शब्द जरा डळमळीत आहे. विश्वासा इतका सॉलिड नाही.

विश्वास म्हणजे खात्री, ठामपणा होय.

एखादा माणूस आपले काम करेल ही आशा वाटते पण भरोसा नाही.

पण ठामपणे जेव्हा सांगतो तेव्हा तो विश्वास असतो.

रोजच्या व्यवहारात अनेक गोष्टींतून आपण विश्वासाला सामोरे जात असतो. 

साधा भाजीवाला, दुधवाला सुद्धा आपल्याला नेहमीचा लागतो त्याचे कारण विश्वास.

विश्वास कमावण्यासाठी अनेक वर्ष लागु शकतात पण गमवायला मात्र एक क्षण सुद्धा पुरतो.

सकारात्मक विचार, दृष्टिकोन हे विश्वासाला पुरक आहेत. सरळ आणि स्पष्ट व्यक्ती विश्वासु असते. 

तुमच्या नेहमीच्या कृतीवरही फार काही अवलंबून असते. ती तुमच्याविषयी विश्वास निर्माण करते.

विश्वास असेल तर प्रगतीपथावर जायला उशीर लागत नाही. लोक तुमच्या मागे लागतील.