घडतो किंवा (बि) घडतोही अशा नातेवाईकांचे आयुष्यात महत्त्व काय? 

18 December 2023

Created By : Mahesh Pawar

आपल्या आयुष्यात नातेवाईक, सगेसोयरे हे हवेतच हवेत.

आपण लहान असल्यापासूनच्या परिस्थितीची हीच आपली माणसं जाणीव करुन देतात.

परिस्थिती चांगली असो वा वाईट! पहिला धडा गिरवायला शिकवतात ते नातेवाईकच असतात.

म्हणून तर आपण घडतो किंवा (बि) घडतोही! दोन्ही आहे.

नातेवाईक म्हणजे आपली माणसं, कोणत्याही शुभकार्याला त्यांच्याशिवाय शोभाच नसते.

निमंत्रण दिल्यावर येतात, कार्याला जमेल तशी आर्थिक, शारीरिक मदतही करतात.

अगदी हक्काने बोलतात, आधार देतात, आशीर्वादही देतात.

महत्त्वाचं म्हणजे आता फक्त काहीच वर्ष हे नातेवाईक आणि सगेसोयरे असतील.

पुढचा काळ मुलांचा आहे. त्यामुळेच वेळीच त्यांना नातेवाईकांची ओळख करून द्या.

नातेवाईक आहेत तर…नातं सांभाळा! एकाकी राहण्यापेक्षा खूप महत्त्व आहे त्यांचं आपल्या आयुष्यात!