आपली इकिगाई (ikigai) काय आहे? 

24 December 2023

Created By : Mahesh Pawar

इकिगाई हा एक जपानी शब्द आहे. याचा अर्थ जगण्याचे कारण, जगण्याचा अर्थ.

इकिगाई असणे म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक करणारे स्पष्ट हेतू असणे.

प्रत्येकाचे काही ध्येय असतं, लक्ष्य असतं. लहानपणापासून आपण ते जोपासत असतो.

त्याच्या ध्येय पूर्तीसाठी कुठेतरी नकळत आपले प्रयत्न चालू असतात.

आयुष्यभर प्रत्येकाची एकच इकिगाई असेल असेही नाही. प्रसंगानुरूप ती बदलते.

वडिलांसोबत कुठे गेलो की म्हणतो अशीच नोकरी करायची ही इच्छा म्हणजेच इकिगाई

निवृत्त झाल्यावर जीवनाचा आनंद घ्यायचा, माणसे जोडायची ही सुद्धा इकिगाईच.

इकिगाई साध्य करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर ती साध्य होते. 

पुरेसे अर्थार्जन करतानाच इकिगाई पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील.