तुम्हीही दररोज 4 कप चहा पित असाल तर काय होईल?

30 october 2025

Created By: Mayuri Sarjerao

चहाप्रेमी त्यांची सकाळ चहाने सुरू करतात आणि रात्रीपर्यंत अनेक कप चहा पितात.

बहुतेक लोक दूध आणि आले घालून चहा पिणे पसंत करतात.

जर तुम्ही दररोज 4 कप किंवा त्याहून अधिक चहा प्यायलात तर गॅस, अ‍ॅसिडिटी या समस्या उद्भवतात

चहाप्रेमी उन्हाळ्यातही भरपूर चहा पितात, परंतु जास्त चहा तुमच्या शरीराला डिहायड्रेट करतो

जास्त चहामुळे केवळ दातांमध्ये पोकळी निर्माण होते, दातांवर पिवळेपणा येऊ शकतो.

जास्त चहा तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकतो. मुरुमे येऊ शकतात आणि तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते

चार किंवा त्याहून अधिक कप पिण्याची सवय असेल तर त्यामुळे निद्रानाश, ताण, हाडांचे नुकसान इत्यादी समस्या उद्भवू शकतात