गेलेला विश्वास परत मिळवण्यासाठी काय कराल? 

29 November 2023

Created By : Mahesh Pawar

समोरच्या माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करूनही तो नीट वागत नाही.

त्या व्यक्तीत थोडा जरी सजीवपणा शिल्लक असेल तर आपल्या वागण्याचा परिणाम दिसून येईल. 

त्याच्या वागण्यात बदल होईल, बोलणे सुधारेल पण वेळ लागेल.

थोडा वेळ जाऊ द्यावा. काहीच सुधारणा नसेल तर दगडाची उपमा देऊन मनावर ताबा ठेवा.

आपले पुढील भविष्य, आपल्यावरील जबाबदारी कशी पार पडता येईल याकडे स्वतःला वळवावे.

अनेक वेळा समजून ऐकत नसेल तर अशा व्यक्तीस आपल्या जीवनातून दुर्लक्षित करावे. 

त्याच्यासोबत कोणताही माणुसकीचा व्यवहार करू नये. ती व्यक्ती अस्तित्वात नाही असे धरून पुढे चालावे.

स्वतःच्या मनाची समजूत काढावी आणि स्वयं सिद्ध बनवावे.