Created By: Atul Kamble

कोणत्या पदार्थांनी होते लिव्हरचे मोठे नुकसान ?

Created By: Atul Kamble

7 June 2026

खराब लाईफस्टाईल आणि चुकीचा डाएट तुमच्या लिव्हरला डॅमेज करु शकतो.

चला तर पाहूयात कोणते पदार्थ तुमच्या लिव्हरला नुकसान पोहचवतात.

खूप जास्त दारु प्यायल्याने लिव्हरच्या पेशी संपतात, ज्यामुळे फॅटी लिव्हर सारखा आजार आणि सोरायसिसचा धोका वाढतो.

सॉफ्ट ड्रिंक्स, कँडी आणि पॅकबंद  ज्यूसमध्ये आढळणारे फ्रुक्टोज लिव्हरमध्ये फॅटच्या रुपात जमा होते.

या शिवाय पिझ्झा, बर्गर आणि फ्राईज सारख्या पदार्थात खूप जास्त ट्रान्स फॅट असते. त्यामुळे हे पदार्थ खाऊ नयेत.

मैद्यापासून बनवलेले पदार्थ उदा.पांढरा ब्रेड आणि इतर पदार्थ. यात फायबरची कमतरता असते. यामुळे शरीरातील फॅट वाढते.

काही बॉडी बिल्डींग वा वेट लॉस सप्लीमेंट्स जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाल्ले तर तुमच्या लिव्हरला नुकसान होऊ शकते.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )