सकाळचा बीपी का वाढलेला असतो ? नियंत्रणाचे उपाय काय ?

Created By: Atul Kamble

6 feb 2026

 सकाळी शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन वाढणे, झोपेतून अचानक उठणे, मीठ जास्त खाणे,झोप पूर्ण न होणे,आधीच हाय बीपी असणे ही सकाळी बीपी वाढण्याची मुख्य कारणे आहेत.चला पाहूयात बचावाचे उपाय काय ते ?

झोपेतून उठल्यानंतर घाईघाईत कामे करु नका, आधी कुशी बदला, मग बसा आणि काही मिनिटांनंतर उभे रहा.अचानक उठल्याने बीपी अचानक वेगाने वाढू शकतो.

 सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहाते.ब्लड सर्क्युलेशन चांगले रहाते. ज्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये रहातो.

जेवणात मीठाचे प्रमाण वाढल्याने सकाळी बीपी वाढू शकतो.कमी मीठाचा आहार घ्या, प्रोसेस्ड फूडपासून दूर रहा.

 रोज ७ ते ८ तास चांगली झोप न घेतल्याने सकाळचा बीपी वाढू शकतो. योग्य वेळी झोपल्याने बीपी नियंत्रणात रहातो.

सकाळचे हलका स्ट्रेचिंग, वॉक वा योग केल्याने तणाव कमी होतो. ब्लडप्रेशर हळूहळू नॉर्मल पातळीवर येते.

सकाळी बीपी नेहमीच वाढत असेल तर रोज एकाच वेळी बीपी चेक करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या