प्रदूषणामुळे घसा खवखवत असेल तर 'या' उपायांनी मिळेल आराम

08 November 2023

Created By : Manasi Mande

गेल्या काही दिवसांत प्रदूषणाची पातळी वेगाने वाढत चालली आहे.

त्यामुळे अनेक आजार डोकं वर काढू लागले असून गळ्यात खवखव, डोळे चुरचुरणे असा त्रासही होत आहे. 

प्रदूषणामुळे तुमचाही घसा खराब झाला असेल, खोकल्याचा त्रास होत असेल तर हे उपाय करून पहा.

मीठ घालून कढत पाण्याने गुळण्या केल्यास घशाला शेक बसून आराम मिळतो.

हळद घातलेले गरम दूध प्यायल्याने घसा तर सुटतोच पण सर्दी-खोकलाही कमी होतो.

भरपूर पाणी पीत रहा. त्याने तुम्ही हायड्रेटेड राहता आणि घसाही कमी खवखवतो. सोसेल तितकं गरम किंवा कोमट पाणी प्यावं.

आलं घातलेला चहा प्यावा. त्याने फ्रेश तर वाटतंच पण त्यातील औधी गुणधर्मांमुळे घशाची खवखवही कमी होते.

बाहेर जाताना मास्क अवश्य वापरा. त्यामुळे हवेतील घातक घटक तुमच्या शरीरापर्यंत, घशापर्यंत पोहोचणार नाहीत.

मासे खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे