'हे' पदार्थ वारंवार गरम करू नका अन्यथा..

07 November 2023

Created By : Manasi Mande

फक्त दुकानातच नव्हे तर बऱ्याच वेळा घरातही एकदा वापरलेलं तेल पुन्हा गरम करून वापरलं जातं.

पण काही पदार्थ वारंवार गरम करणं हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतं.

 तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, काही पदार्थ पुन्हा-पुन्हा गरम केल्यास त्यामुळे कॅन्सर, हाय बीपीसह अनेक आजारांचा धोका उद्भवतो.

काही लोकांना एकदा चहा करून तो वारंवार गरम करून प्यायची सवय असते. पण त्यामुळे ॲसिड वाढून गंभीर आजार होऊ शकतो.

 पालकात खूप लोह असते, वारंवार गरम केल्यास ते ऑक्सीडाईझ्ड होते. त्यामुळे अनेक आजारांचा धोक वाढू शकतो.

खाण्याचे तेल पुन्हा गरम केलं तर टॉक्सिन उत्पन्न होतात. सतत असे तेल वापरल्यास कॅन्सरही होऊ शकतो.

मशरूम्समध्ये खूप प्रोटीन्स असतात, पण पुन्हा गरम केल्यावर प्रोटीनचे कंपोझिशन बदलते, ज्याने पचनाची समस्या उद्बवते.

रिपोर्ट्सनुसार, भात पुन्हा गरम केल्यास त्यातील बॅक्टेरियाची संख्या दुप्पट होते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

सारा की सारा तेंडुलकर ? शुबमन नक्की कोणत्या साराला करतोय डेट ?